वीज थकबाकी वसूल न झाल्यास स्थिती गंभीर : नितीन राऊत

मुंबई प्रतिनिधी | आधीच्या सरकारने थकबाकीचा वाढवलेला डोंगर आणि यानंतर कोरोनासह अन्य आपत्तींमुळे वीज बिलांची वसुली तब्बल ७९ हजार कोटींवर गेली असून याची वसुली न झाल्यास राज्य अंधारात जाऊ शकते अशी चिंता उर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.

वीजबिलाच्या थकबाकीबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यानंतर पत्रकारांशी बोलताना उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले की, आधीच्या सरकारमुळे आज ही भयंकर स्थिती आलेली आहे. विद्यमान सरकार आल्यानंतर करोनाचं संकट आलंय. मागच्या सरकारने जो थकबाकीचा डोंगर उभा केला आहे त्याची वसुली, चक्रीवादळं आली, अतिवृष्टी झाली, महापूर आले आणि या सगळ्या संकटांशी झुंजत असताना महावितरणची आर्थिक स्थिती काय आहे यावर आजच्या बैठकीत विचार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली आहे. वीजबिलाची वसुली करता आली नाही. जर वेळेत थकबाकी झाली नाही तर राज्य अंधारात जाऊ शकतं अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

नितीन राऊत पुढे म्हणाले की, कोरोनामुळे गेल्या वर्षभरात राज्यातील वीजग्राहकांनी विजेचे पैसे भरण्यास टाळाटाळ केल्याने वीजग्राहकांकडील महावितरणची थकबाकी ७९ हजार कोटी रुपयांवर गेली आहे. महसूलटंचाई असल्याने वीजखरेदीचे पैसे देण्यास महावितरणला विलंब होत आहे. त्यापोटी विलंब आकाराची तरतूद आहे. त्यामुळे आपल्याकडून घेतलेल्या विजेचे पैसे वेळेत न दिल्याने विलंब आकाराची मागणी चार खासगी वीज कंपन्यांनी केली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!