वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समितीतर्फे खाजगीकरण विरोधात द्वारसभा निदर्शने

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महावितरण जळगांव परिमंडळ कार्यालयासमोर वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समितीतर्फे खाजगीकरण,कंत्राटीकरण, फ्रैंचाईझी धोरण विरोधात द्वारसभा घेत निदर्शने करण्यात आली.

केंद्र व राज्य सरकारचे खाजगीकरण व फ्रैंचाईझीकरण, भांडवलशाहीला प्रोत्साहन देत, सार्वजनिक उद्योगांचे खच्चीकरण करून कामगार कर्मचारी व सामान्य जनता यांना देशोधडीला लावण्याचा धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध करीत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी २५ संघटनांची अभेद्य एकजुट सज्ज झाली आहे. सार्वजनिक उद्योग, वीजउद्योग खाजगीकरण झाल्यास त्याचे विपरीत परिणाम सामान्य ग्राहक, लघु उद्योजक, शेतकरी यांना मिळणारे अनुदान बंद होऊन, मनमानी पद्धतीने दर आकारणी होईल, आझाद मैदानावरील आंदोलनात ऊर्जा राज्यमंत्र्यांनी १६ शहराचे खाजगीकरण करणार नसल्याचे जाहीर केले होते, परंतु संघर्ष समितीसोबत कोणतीही चर्चा अथवा बैठक झालेली नाही, खाजगीकरण हे कामगार विरोधी व देश विरोधी असल्याने संघर्ष समितीतर्फे २८ आणि २९ मार्च असा दोन दिवसीय संप १०० टक्के यशस्वी करण्यासाठी ८६००० कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंता यांनी निर्धार केला आहे.  यावेळी द्वारसभेत महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे कॉ.विरेंद्र पाटील ,सबॉर्डीनेट ईंजिनिअर्स असोसिएशनचे पराग चौधरी, कुंदन भंगाळे, तांत्रिक युनियनचे रविंद्र पाटील , प्रदीप पाटील, विजय सोनवणे, सुरेश गुरचळ, हिरालाल पाटील, संतोष सोनवणे आदी कामगार कर्मचारी अधिकारी अभियंते यांनी सहभाग नोंदवला

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!