वीज उद्योगांचे खाजगीकरण रद्द करा (व्हीडीओ)

केंद्र सरकार विरोधात वीज कर्मचाऱ्यांची निदर्शने

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – केन्द्र सरकारने उर्जा क्षेत्रांतील घटकांशी विचारविनिमय न करता एकतर्फी निर्णय घेत विद्युत (संशोधन) बील पास करून घेण्यास प्रस्तावित केले आहे. त्याला देशांतील वीज उद्योगांतील सर्व कर्मचारी व इंजिनिअसंच्या संघटनांतर्फे विरोध म्हणूत दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारला असून आज जळगाव महावितरणच्या अयोध्यानगर परिसरातील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

महावितरण, निर्मिती व पारेषण या वीज कंपन्याच्या  तिन्ही विभागातील अधिकारी, कर्मचारी वर्गातर्फे केंद्र सरकारचे सरकारी उद्योगांचे खाजगीकरण तसेच  महाराष्ट्राच्या ६ जलविद्युत केन्द्राचे खाजगीकरण रद्द करावे, स्वतंत्र कृषी कंपनी निर्मितीचा निर्णय मागे घ्यावा, तिनही कंपन्यामधील एकतर्फी बदली धोरण रद्द करावे, ३० हजार कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षापर्यंत नोकरीचे सरंक्षण देण्यात यावे, ४० टक्के पेक्षा जास्त रिक्त असलेल्या जागांवर कर्मचारी सरळ सेवा भरती करण्यात यावी, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीसह राजकीय वाढता हस्तक्षेप बंद करावा आदि मागण्यासाठी महावितरणच्या कामाच्या ठिकाणी सर्व कर्मचारी, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार निदर्शने करीत शांततेच्या मार्गाने संप पुकारला आहे. हा संप सर्वांनी शांतपणे व शिस्तीने करावा अश्या सुचना संघर्ष समिती व कृती समितीने सभासदांना दिल्या असून उर्जा उद्योगाच्या व कंपन्यांच्या अस्तित्वा करीता हा संप असल्यामुळे संप काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची सर्व संपकरी संघटनांनी संपकरी कर्मचाऱ्याना दिली आहे.
यावेळी .कॉ.विरेंद्रसिंग पाटील,पराग चौधरी,आर आर सावकारे,विजय सोनवणे,एस के लोखंडे,सादिक शेख, महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य वीज कामगार कंत्राटी संघटना कृती समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!