विसनजी नगरातील धान्य व्यापाऱ्याची २५ हजाराची ऑनलाईन फसवणूक

 

 

जळगाव : प्रतिनिधी । विसनजी नगरातील एका व्यापाऱ्याला ‘फोन पे’ कस्टमर केअर म्हणून बोलत असल्याचे बतावणी करून खात्यातून परस्पर २५ हजार रूपये काढून घेतल्याचा प्रकार गुरूवारी दुपारी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, अतुल नारायण बाविस्कर (वाणी) (वय-४७) रा. नारायण प्लाझा नवीपेठ, यांचे गोलाणी मार्केट येथे किरकोळ धान्याचे दुकान आहे. ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता (६२६३९६४४३७) या क्रमांकावरून अतुल बाविस्कर यांना फोन आला. आपण ‘फोन-पे’ कंपनीच्या customer care मधून बोलत असल्याची बतावणी करून अज्ञात व्यक्तीने अतुल बाविस्कर यांच्या खात्यातून २४ हजार ९९६ रूपये परस्पर काढून घेतले. फोन ठेवल्यानंतर थोड्यावेळाने त्यांच्या मोबाईलवर पैसे कट झाल्याचे मॅसेज आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुरूवारी दुपारी शहर पोलीस ठाणे गाठून हकीकत सांगितली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे करीत आहे.

Protected Content