विषबाधेच्या घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणीवेळी सुरक्षा किट वापरण्याचे कृषि विभागाचे आवाहन

शेअर करा !

जळगाव (प्रतिनिधी) फवारणीच्यावेळी आवश्यक ती काळजी न घेतल्याने होणारी विषबाधा टाळण्यासाठी किटकनाशके उत्पादक कंपन्यांनी फवारणीच्या वेळी वापरण्यात येणारे सुरक्षा साहित्य (Safety Kit) शेतकऱ्यांना विक्रीकरीता उपलब्ध करुन देण्यात यावे, तसेच कोरोना (कोविड-19) च्या प्रादुर्भावामुळे मोबाईल ॲप्सद्वारे शेतकऱ्यांशी संपर्क साधुन त्यांना मार्गदर्शन करावे, तसेच किटकनाशक विक्रेत्यांनीही याबाबत शेतकऱ्यांना जागरुक करावे आणि योग्य किटकनाशकांचा पुरवठा करुन हाताळणी व फवारणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे. अशा सुचना अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी दिल्यात.

store advt

 

खरीप हंगाम सन 2020 च्या किटकनाशकांच्या विषबाधा प्रकरणी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत आढावा बैठक अप्पर जिल्हाधिकारी श्री. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, कृषी उपसंचालक, कृषी विकास अधिकारी, जि. प., जळगाव, मोहिम अधिकारी, जि .प., जळगाव, नोडल कंपनी- मे. क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनचे जिल्हा प्रतिनिधी तसेच इतर कंपन्यांचे जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.  रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी किटकनाशकांऐवजी लाईट ट्रॅप, फेरामन ट्रॅप, जैविक किटकनाशके यांचा वापर करण्याचे तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर पुरेश्या प्रमाणात विष प्रतिबंधक औषधांचा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.  शेतकऱ्यांना फवारणी करतेवेळी कोणत्याही प्रकारची विषबाधेची लक्षणे जाणवल्यास त्यांनी त्वरीत जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून उपचार करावे. असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी श्री. महाजन यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना केले आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!