विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे हिंदू साम्राज्य दिवस साजरा

जळगाव, प्रतिनिधी । विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे जळगाव शहरातील कोर्ट चौक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक कार्यक्रमानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पंचामृत व्दारा अभिषेक करण्यात आला. 

उद्योजक खंडू पवार व  राजेश मलिक यांच्या हस्ते पंचामृतद्वारे प्रतिमेचे अभिषेक करण्यात आले व अभिवादन पूजन संपन्न झाले.  तरी यावेळी उपस्थित विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार यांनी आपले मनोगत व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांची तथा चारित्र्याची माहिती उपस्थितांना सांगितली.  कार्यक्रमामध्ये विश्व हिंदू परिषद जिल्हामंत्री देवेंद्र भावसार, सहमंत्री श्रीराम बारी, बजरंगदल जिल्हा संयोजक राकेश लोहार, बजरंगदल जिल्हा सुरक्षा प्रमुख राजु नन्नवरे , जिल्हा सह धर्मप्रसार प्रमुख  आकाश फडे, वि.हिं.प. प्रचार प्रसिध्दी प्रमुख महेश अंबिकार, बजरंग दल जळगाव महानगर संयोजक समाधान पाटील, गोरक्षा प्रमुख आकाश पाटील, राहुल सूर्यवंशी, विशाल जगदाळे, पवन शिंपी, विजय कासार, चेतन खैरनार, गोपी हटकर, कौशल क्षीरसागर आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.