विवेक नगरात तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । घरातील ताण व नैराश्येतून पस्तीस वर्षीय तरूणाने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना विवेक नगरात आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

store advt

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राहुल वसंत पाटील (वय-३५) रा. विवेक कॉलनी हा आपल्या आईवडीलांसह राहतो. वडील नेहमी आजारी व व्हिल चेअरवर बसून राहतात. तर आईला देखील नेहमी आजारी असते. यात राहूल अपंग असल्याने त्याला आईवडीलांचे काळजी घ्यावी लागते. कामाच्या ताण व नैराश्येतून राहुलने मध्यरात्री पंख्याला दोरी बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे. तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. रविंद्र महाजन यांनी मयत झाल्याचे घोषीत केले. याप्रकरणी वैद्यकिय अधिकारी यांच्या खबरीवरून रामानंदन नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे व विलास पवार करीत आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!