विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेत सुरेल कौतुक सोहळा

जळगाव, प्रतिनिधी  । विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी कुमारी सेजल महेंद्र वाणी हिच्या सांगितिक प्रवासास शुभेच्छा व प्रोत्साहनपर कौतुक करण्यासाठी सुरेल कौतुक सोहळ्याचे आयोजन केले होते. 

 

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक हेमराज पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून  महेंद्र वाणी, मनीषा वाणी तसेच प्राथमिक शिक्षक संजय नन्नवरे उपस्थित होते. t-series भक्ती सागर या अल्बममध्ये  सेजल हिचे कृष्णा कृष्णा हे तिचे गाणे रिलीज झाले. या निमित्ताने कौतुक सोहळा संपन्न झाला. कुमारी सेजल वाणी हिचा सत्कार मुख्याध्यापक हेमराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.  मनोगतात तिने गाणे गाऊन दाखवले.  प्रमुख पाहुणे संजय नन्नवरे यांनी कृष्णा कृष्णा स्वरचित गीताची निर्मिती कशी झाली हे सांगितले तसेच महेंद्र वाणी यांनी मुलीबद्दलचा अभिमान सांगताना या सर्व प्रवासात साथ देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मित्र परिवाराचे आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन समन्वयिका वैशाली पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिन गायकवाड यांनी केले तसेच महेंद्र वाणी व मनीषा वाणी यांनी याप्रसंगी ग्रंथालयास अनाथांची आई (सिंधूताई सपकाळ) ह्या पुस्तकाच्या तीन प्रती शाळेस भेट दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक हेमराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच समन्वयिका वैशाली पाटील, जयश्री वंडोळे यांचे सहकार्य लाभले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!