विवाहितेचा हात पकडून विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील शेवाळे येथील एका २७ वर्षीय महिलेचा शहरातील भारत डेअरी स्टाॅपवर एका इसमाने हात पकडत जबरदस्तीने मोटरसायकलवर बसविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेवाळे ता. पाचोरा येथील इसमाविरुद्ध महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाचोरा पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील शेवाळे ता. पाचोरा येथील महिला पाचोरा शहरात खाजगी नौकरी करुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत आहे. १५ मे रोजी पिडीत महिला ही सायंकाळी घरी जात असतांना शहरातील भारत डेअरी स्टाॅपवर रामेश्वर पाटील (पुर्ण नाव माहित नाही) रा. वाडी ता. पाचोरा हा इसम महिले जवळ येऊन महिलेचा हात पकडत तिला जबरदस्तीने मोटरसायकलवर बसविण्याचा प्रयत्न करत तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याने पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये रामेश्वर पाटील यांचे विरुध्द विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार भगवान बडगुजर हे करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content