विवाहितेचा छळ करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

 

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । व्यवयाय करण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावेत या कारणावरुन जळगाव शहरातील ममुराबाद रोड परिसरातील प्रजापत नगर येथील विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांविरोधात गुरुवार, ९ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

प्रजापत नगर येथील माधुरी यांचा भुसावळ येथील आकाश विलास मगरे यांच्याशी विवाह झाला आहे, लग्न झाल्यानंतर एक महिना चांगला गेला, त्यानंतर व्यवयास करण्यासाठी माधुरी हिने तिच्या माहेरुन आईकडून दोन लाख रुपये आणावेत अशी मागणी वेळावेळी माधुरी हिच्याकडे पतीसह सासरच्यांनी केली, तसेच याच कारणावरुन माधुरी हिला वेळावेळी शिवीगाळ करत मारहाण करुन तसेच जीवे मारण्याची धमकी देत शारिरीक व मानसिक छळ केला. छळाला कंटाळून माधुरी ह्या जळगावात माहेरी निघून आल्या व त्यांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन माधुरी हिचे पती आकाश विलास मगरे, सासू संगीता विलास मगरे, दोन्ही रा. तापी नगर राममंगल, कॉलनी प्लॉट नं, ५६ भुसावळ, नणंद शिल्पा योगेश बागुल, नंदोई योगेश जगन्नाथ बागुल दोन्ही रा. भुसावळ, व लहान नणंद मनिषा नितेश पगारे रा. औरंगाबाद या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास शिंदे हे करीत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content