जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सालार नगरातील विवाहितेचा मुळ बाळ होत नाही, तसेच लग्नात हुंडा कमी दिला या कारणावरुन छळ करणाऱ्या विवाहितेच्या पतीसह सहा जणांविरोधात सोमवार, ३ जुलै रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील ख्वॉजा नगर, हुडकोतील रहिवासी असलेलया बुशराबी परवीन जुबेर शेख वय २५ यांचा सालार नगरातील जुबेर रियाज शेख यांच्यासोबत झाला आहे. लग्नानंतर मूळबाळ होत नाही, तसेच लग्नात हुंडा कमी दिला, या कारणावरुन पती जुबेर यांच्यासह सासरच्या मंडळींनी बुशराबी यांचा वेळोवेळी शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत छळ केला. १९ जुलै २०२२ ते ३ जुलै २०२३ पर्यंत अशाप्रकारचा छळ करण्यात आल्याचे बुशराबी यांनी तक्रारीत म्हटले आहे. छळाला कंटाळून बुशराबी या माहेरी निघून आल्या. व त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन सोमवारी बुशराबी यांचे पती जुबेर शेख, सासरे रियाज शेख, सासू नजमा शेख रियाज, मोठी नणंद राणी शेख एजाज, नणंद अमरीन शेख रियाज, आफरीन शेख शोएब सर्व रा. सालारनगर, जळगाव या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हर्षल पाटील हे करीत आहेत.