विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे पहूर येथे स्वागत : सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा(व्हिडिओ)

शेअर करा !

पहूर ,ता. जामनेर, रविंद्र लाठे। महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी दोन वाजता पहूर बस स्थानकावर आगमन झाले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले

store advt

जळगावहुन औरंगाबादकडे जात असतांना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ,राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ,माजी जलसंपदा मंत्री ताठ आमदार गिरीश महाजन यांचे यावेळी कार्यकर्त्यांनी स्वागत केले. शेतकऱ्यांच्या समस्यांची निवेदन देण्यात आले. पिक विमा योजनेचा लाभ मिळावा, महात्मा फुले कर्ज माफी योजनेला कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा व्हावा नेहमीच शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत कर्जमाफी मिळावी या विषयांची निवेदनेही यावेळी देण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष चंदू बावस्कर,सरचिटणीस रवींद्र झाल्टे ,माजी पंचायत समिती सभापती बाबुराव अण्णा घोंगडे,माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे ओबीसी सेल भाजपा तालुकाध्यक्ष वासुदेव घोंगडे ,आरोग्यदूत अरविंद देशमुख सरपंच पती रामेश्वर पाटील ,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय देशमुख , राजू जाधव ,चेतन रोकडे आदी उपस्थित होते.

जमावबंदीचे व सोशल डिस्टन्सिंगचे वाजले बारा

सध्या कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने पहूरसह परिसरात थैमान घातले असून कालपर्यंत पहूर येथे कोरोना बाधितांची संख्या तब्बल ३५ वर पोहोचली असतांना याचे गांभीर्य अजुनही कोणास वाटत नसल्याची खंत आहे. असे असतांनाही कोठेही गर्दी होऊ नये व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून नियमाचे उल्लंघन होता कामा नये. असे असतांनाही पहूर येथे आज माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पहूर येथील बसस्थानक परिसरात आगमन होताच कार्यकर्ते यांची खुप मोठी गर्दी झाली होती. यामुळे सध्या जमावबंदी चे आदेश असतांना ऐवढा जमाव झाला कसा व सोशल डिस्टन्सिंगचे सरळसरळ उल्लंघन होतांना दिसून आले. पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, उपनिरीक्षक अमोल देवडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

 

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!