विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक असा उल्लेख करून अवमान केला आहे. पवार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपाच्यावतीने शास्त्री टॉवर चौकात सोमवारी २ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता निषेध करत अजित पवार यांच्या बॅनरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले

नागपूर अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मवीर नव्हे तर स्वराज्य रक्षक असा उल्लेख केला होता. जळगाव शहर व तालुका भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत अजित पवार यांच्या फोटो बॅनरला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित पवार हाय हाय, धरणवीर अजित पवार.. अशा घोषणा देण्यात आल्या. आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वात अजित पवार यांच्या निषेधार्थ निदर्शने करत अजित पवारांच्या बॅनर ला जोडे मारून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. दरम्यान अजित पवार यांच्याबाबत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.

याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, भाजपा महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, नगरसेविका सुचिता हाडा यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content