विरावली, सावखेडा सिम व मोहराळा येथील विविध विकास कामांना शुभारंभ

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील विरावली येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन माजी आमदार तथा रावेर लोकसभा क्षेत्राचे शिवसेना सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नानी व आ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते पार पडले.

 

विविध विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाना सोनवणे हे होते. यावेळी दहिगाव ते विरावली फाटा ५ किमी रस्ता १ कोटी ८० लाख, विरावली ग्रामपंचायत कार्यालय २० लाख, विरावली गावात पुलाचे बांधकाम करणे ५० लाख, विरावली गावात २ पेव्हर ब्लॉक १० लाख एकूण २ कोटी ६० लाख निधीच्या कामांचे उदघाटन व भूमिपूजन संपन्न झाले . याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख व कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे काळजीवाहु सभापती मुन्ना पाटील, शिवसेना तालुका प्रमुख रवी सोनावणे , युवासेना तालुका प्रमुख गोटू सोनवणे , सेनेचे माजी तालुका प्रमुख कडू पाटील , पप्पू जोशी , शरद कोळी , संतोष धोबी , आशिष झुरकाळे , धनराज पाटील , मोहराळा सरपंच सौ .नंदा गोपाळ महाजन, लक्ष्मण बडगुजर , जिभु बडगुजर , सरपंच सौखेडा सिम विकास पाटील , समाधान सोनवणे , सारंग बेहडे , नितीन पाटील , आर के चौधरी सर , विरावलीच्या सरपंच कालीमा तडवी , उपसरपंच मनीषा पाटील , ग्राम पंचायत सदस्य नथु अडकमोल , हमीद तडवी , महबुब तडवी , राजेंद्र पाटील , संजय पाटील , कैलास पाटील , माधु साळुंखे , दामा अडकमोल , कौतुक अडकमोल , पाटील , समाधान पाटील , हबीब तडवी , शब्बीर तडवी , नसीर तडवी , सुपडू पठाण , सुभाष पाटील , कैलास राजधर पाटील , गजश्री पाटील , भावना पाटील , माधुरी पाटील , सुनीता पाटील , विद्या पाटील , बानुबाई तडवी , विरावलीचे ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!