विधानपरिषदेत एक आमदाराला सात कोटी ! : अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत एका आमदाराला सात कोटी रूपये मिळाल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदा अमोल मिटकरी यांनी केला आहे.

 

गेल्या महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीनंतर काही तासांमध्येच एकनाथ शिंदे यांनी वेगळा मार्ग निवडून राज्यात सत्तांतर घडवून आणले होते. या निवडणुकीत अनेक आमदारांनी क्रॉस-व्होटींग केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यासाठी मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा देखील रंगली होती. या पार्श्‍वभूमिवर, आज राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

 

आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, एका पक्षाचे तीन आमदार फुटले होते. यासाठी त्यांना प्रत्येकी सात कोटी असे एकूण २१ कोटी रूपये देण्यात आले होते. आपल्यालाही दुसर्‍या पक्षाने गटनेतेपदासह पैशांची ऑफर दिली असून आपण याला धुडकावल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.