विद्यार्थ्यांनी दिले अधिष्ठातांंना ‘चित्र’ भेट

जळगाव, प्रतिनिधी  । शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसराचे वातवरण स्वच्छ व प्रसन्न झाले आहे.याचे  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या २०१७-१८ च्या प्रथम बॅचच्या  विद्यार्थ्यांनी एक सुंदर चित्रच काढून अधिष्ठाताना  सप्रेम भेट दिले. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विद्यार्थ्यांच्या कलेचे व भावनांचे कौतुक केले. 

 

 

येथील शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची स्थापना ११ मे २०१७ रोजी झाली. त्यानंतर पहिली बॅच प्रवेशित झाली.  ती आज तिसऱ्या वर्षाला आहे. या वर्गातील विद्यार्थिनी दिव्या बुजाडे,  हर्षदा बडदे या विद्यार्थिनी गेली ३ वर्षे या महाविद्यालयाच्या आवारात वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. सुरुवातीला परिसरात अस्वच्छता, साफसफाईचे नियोजन नाही, व्यवस्थापन देखील चांगले नव्हते. मात्र आज महाविद्यालयाचा परिसर हा उत्तम व मनमोहक झालेला असून साफसफाईचे नियोजन चांगले दिसून येत असल्याचे ते सांगतात. वृक्षारोपण, रंगरंगोटी, रंगीत पेव्हर ब्लॉक, रस्ता डांबरीकरण यामुळे सुशोभीकरणात भर पडली असेही ते  सांगतात. शिक्षण घेण्यासाठी लागणारी प्रसन्नता लाभते असेही ते म्हणतात. आताच फेस इंडिया ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा पुरस्कार शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला मिळाला म्हणून त्यांनी एक आठवण म्हणून अधिष्ठाता कार्यालयाचे चित्तवेधक चित्र तयार करून त्याची फ्रेम करीत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सप्रेम भेट दिले. कृतज्ञता म्हणून विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर करून अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी कौतुक केले. यावेळी विद्यार्थी मयूर अहिरे उपस्थित होता.

 

Protected Content