जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या सहय्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन २७ व २८ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला.
या दोन दिवशीय कार्यक्रमात दि.२७ रोजी प्रा. डी.एस. भारंबे जळगाव यांचे प्रयोगातून विज्ञान या विषयावर विविध प्रात्याक्षिकांसह व्याख्यान झाले. प्रास्ताविक प्रशाळेचे संचालक प्रा. डी. एस. पाटील यांनी तर समन्वयक म्हणून डॉ. संजय घोष यांनी काम पाहिले. दुस-या सत्रात उद्योजक कमलेश जोशी पुणे यांनी व्यवसाय मार्गदर्शन या विषयावर व्याख्यान दिले. दुपार सत्रात पोस्टर्स स्पर्धा व वकृत्व स्पर्धा घेण्यात आली.
२८ रोजी प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. दुपारच्या सत्रात बंगळूरू येथील ब्रिटीश टेलीकॉमच्या सायली पाटील यांनी कॉर्पोरेटमध्ये करीअर या विषयावर मार्गदर्शन करून मुलाखत कौशल्यावर विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी डॉ.जसपाल बंगे यांनी परीश्रम घेतले. यावेळी प्रशाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी संशोधक विद्यार्थी हे उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.