जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील कंत्राटी व रोजंदारीवरील कर्मचार्यांना लॉकडाऊनच्या कालावधीतील वेतन दोन दिवसात अदा करण्याची मागणी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील यांनी कुलगुरूंकडे आहे.
या संदर्भात वृत्त असे की, लॉकडाऊनच्या कालावधीत कुणाचेही वेतन कमी करू नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तथापि, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कंत्राटी आणि रोजंदारीवरील कर्मचार्यांना अद्याप लॉकडाऊनच्या कालावधीतील वेतन मिळाले नसल्याने त्यांना खूप प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे या कर्मचार्यांना दोन दिवसांत त्यांचे थकीत वेतन अदा करण्यात यावे अशी मागणी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील यांनी कुलगुरूंकडे केली आहे. त्यांनी आज सकाळी याबाबतचा ई-मेल कुलगुरूंना पाठविला आहे.