विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या परिक्षेच्या वेळापत्रकात बदल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक/लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून या परीक्षा २२ मे ऐवजी २५ मे पासून सुरु होतील.

विद्यार्थी व महाविद्यालयांकडून करण्यात आलेल्या मागणी नुसार विद्यापीठाच्या विधी विद्याशाखेतील विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या परीक्षा पुढील प्रमाणे आयोजित करण्यात येत आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार विधी विद्याशाखेच्या प्रात्यक्षिक परीक्षा २५ मे ते २ जून या कालावधीत होणार आहेत. तसेच बी.ए. एल.एल.बी. सेमीस्टर ३, ४, ७, ८, ९, १० व एल.एल.बी. सेमीस्टर ३, ४, ५, ६ या सर्व वर्गांच्या लेखी परिक्षा १० जून पासून सुरु होतील. विधी पदविका अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा १२ जून पासून सुरु होतील. एल.एल.एम. या पदव्युत्तर वर्गाच्या लेखी परीक्षा १७ जून पासून सुरु होतील. बी.ए.एल.एल.बी.च्या सेमीस्टर १, २, ५, ६ व एल.एल.बी.च्या सेमीस्टर १ व २ या सर्व वर्गांच्या लेखी परीक्षा ३ जुलै पासून सुरु होतील. परीक्षेतील तारखा बदल संदर्भातील परीपत्रक विद्यापीठाशी संलग्नित सर्व विधी महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे. तसेच विद्यापीठ संकेतस्थळावर (www.nmu.ac.in) उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तरी विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या तारखांतील बदलाची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.दीपक दलाल यांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content