विद्यापीठाच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आक्टोबरमध्ये होणाऱ्या व्दितीय विज्ञान आणि कला वर्षाच्या तीन आणि चार सत्राच्या परीक्षा वेळापत्रकाबाबत सुधारित परीपत्रके विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्च-एप्रिल महिन्यात आयोजित परिक्षा पुढे ढकलण्यात आले असून नव्याने परीक्षांचे आयोजन करतांना विद्यापीठ परीपत्रकान्वये व्दितीय वर्ष विज्ञान सत्र-3 व 4 च्या विषयांची परीक्षा आणि व्दितीय वर्ष कला सत्र-4 च्या विषयांची सुधारित वेळापत्रक विद्यापीठाने संकेतस्थळावर जाहिर केली आहेत. तांत्रिक अडचणीमुळे या वेळोपत्रकानुसार काही विषयांची परीक्षा ही पूर्वीच्या जाहिर केलेल्या वेळापत्रकातील दिनांकानुसार/वेळेनुसार न होता त्याऐवजी वेळापत्रकात बदल करण्यात आलेले आहेत.

या परीक्षांची पूर्वी जाहिर केलेली परिक्षा रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे महाविद्यालये आणि संबंधित परीक्षा देणाज्या विद्याथ्र्यांनी आवर्जुन ही परीपत्रके अवलोकनात आणावीत आणि परीक्षेचे विषय, तारीख व वेळेतील बदल लक्षात घ्यावा असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी कळविले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.