वासरे येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वासरे येथे  २५ वे अखंड हरिनाम सप्ताहास दि. ३ पासून प्रारंभ झाला आहे.

 

श्री. ह.भ. प. दिगंबर बाबा अमळनेरकर यांच्या प्रेरणेने व श्री.ह.भ.प. भगवानजी महाराज शहापूरकर यांच्या मार्गदर्शनाने या  तिसऱ्या दिवशी कीर्तन श्री. ह.भ. प.अनिल महाराज यांचे किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांची अमृतवाणी ऐकण्यास ग्रामस्थ मोठ्या संख्येने येत आहे. किर्तनाचा उपदेश राम चरित्र यावर आधारित संपूर्ण रामायण सांगण्यात आले. अतिशय सुंदर पद्धतीने कीर्तन झाले. मार्गदर्शक श्री हभप प्रदीप महाराज वासरे यांनी पुढील मार्गदर्शन केले. सदर हरिनाम सप्ताहास वासरे भजनी मंडळासह पंचक्रोशीतील खर्दे, पाडसे, शहापूर, कळमसरे, खेडी, गोवर्धन, मारवड आदी गावातून भजनी मंडळाचे सहकार्य लाभत आहे. या सप्ताह कीर्तनाची सांगता दि.१० रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम देखील ग्रामस्थांनी आयोजित केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content