रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील पाल येथून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल पथकाने कारवाई करत जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
रावेर तालुक्यातील पाल येथून अवैध वाळुने भरलेले दोन ट्रक्टर सहस्त्रलिंग गावा नजिक तहसीलदार बंडू कापसे व अप्पर तहसीलदार मयूर कळसे यांनी पकडले आहे.यामुळे वाळु माफीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे तहसीलदार जेव्हाही फिल्डवर जातात प्रत्येक वेळी कारवाई होते. परंतु नेहमी फिल्डवर राहणारे मंडळ अधिकारी तलाठींचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
तहसीलदार बंडू कापसे अप्पर तहसीलदार मयूर कळसे हे पाल येथे सोमवारी सकाळी जात असतांना त्यांना अवैध वाळूने भरलेले दोन ट्रक्टरे येतांना दिसली. ती ट्रक्टरे थांबवली असता त्यात अवैध वाळु आढळून आले. त्यांनी वाळूने भरलेली दोन्ही वाहने रावेर तहसील कार्यालय येथे जमा केली आहे. पालकडून नेहमी अवैध वाळू वाहतूक होत असल्याची ओरड आहे. परंतु याकडे मंडळ अधिकारी तलाठी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याची कायमची ओरड आहे.