वाळू वाहतूक करणारा ट्राला पकडला !

रावेर शहरातील घटना; रावेर महसूल पथकाची कारवाई

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातून मध्यरात्री ट्रालाच्या माध्यमातून वाळूची वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. रावेर महसूल विभागाच्या प्रशिक्षणार्थी तहसीलदार यांनी ही कारवाई केली असून ट्राला जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाळू वाहतूकादारांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर शहरातून मध्यरात्री दिडच्या सुमारास (एमएच २० ईजी ६१९७) चौदा चाकी ट्रालाच्या माध्यमातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली. त्यानुसार प्रशिक्षणार्थी तहसीलदार डॉ मयूर कळसे यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने रात्री कारवाई करत ट्राला जप्त केला आहे. कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाल (ता रावेर) येथून सुकी नदी पात्रातुन दरोरोज शेकडो ब्रास वाळूचा अवैध उपसा सुरु आहे. ट्रकाद्वारे ही वाळू रात्री दोन ते तीनच्या सुमारास रावेर रसलपुर कुसुंबा सावदा भागात पोहचवली जाते. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे.याकडेकही लक्ष देण्याची मागणी होत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content