वाळूने भरलेले ट्रॅक्टर पेटवून दिल्या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणे गावात वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने रिक्षाला धडक दिली होती. यात रिक्षाचालकासह महिला जखमी झाल्या होत्या. या कारणावरून संतप्त नागरिकांनी वाढवणे भरलेले दोन ट्रॅक्टर पेटवून दिले होते. याप्रकरणी मंगळवार ९ मे रोजी रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात मंगळवारी ९ मे रोजी दुपारी २ वयाच्या सुमारास ट्रॅक्टर चालक सुनील अशोक पाटील हा ट्रॅक्टर (एमएच १९,डी ६३५४) मधून विनापरवाना वाळू वाहतूक करीत होता. त्यावेळी ट्रॅक्टरने प्रवासी रिक्षा (एमएच १९ सीडब्ल्यू १४१३) या रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा चालकासह तीन प्रवाशी महिला जखमी झाले होते.  हे घटना घडल्यानंतर आव्हाणे गावातील संतप्त झालेल्या नागरिकांनी ज्वलनशील पदार्थ टाकून दोन्ही ट्रॅक्टरला पेटवून दिले होते. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अतुल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक सुनील अशोक पाटील, ट्रॅक्टर चालक रेवसिंग उर्फ राहुल वीरसिंग बारेला, जगदीश बाबूलाल ढोले, देवेंद्र दत्तात्रय पाटील, किरण पांडुरंग ढोले, काशिनाथ शिवाजी ढोले, सय्यद इकबाल सय्यद गफार आणि शेख रऊफ शेख युसुफ सर्व रा. आव्हाणे ता. जि. जळगाव यांच्या विरोधात गैरकायद्याने मंडळी जमवून जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन करून ट्रॅक्टर पेटवून दिल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content