वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निमखेडी शिवारातील पाणी पाऊच फॅक्टरीजवळून वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर जळगाव तालुका पोलीसांनी पकडले आहे. याबाबत मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमखेडी शिवारातील पाणी पाऊच फॅक्टरजवळून ट्रॅक्टरमधून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार कारवाई करण्याच्या सुचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले. वाळू वाहतूकीबाबत कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रक्टर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात जमा केले आहे. पोलीस नाईक दिपक कोळी यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक विलास शंकर सपकाळे (वय-३०) रा. साईबाबा मंदीराजवळ, निमखेडी शिवार, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सतिष हारनोळ करीत आहे.

Protected Content