वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर पोलीसांनी पकडले असून ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यात वाळू उपसावर जिल्हाधिकारी यांनी निर्बंध लावले आहे. यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून गस्त वाढविण्यात आले आहे. शिवकॉलनी येथील राष्ट्रीय महामार्गावरून सोमवार ९ मे रोजी पहाटे ५ वाजता विना क्रमांकाचे ट्रॅक्टरमधून वाळूची चोरीटी वाहतूक होत असल्याचे गस्तीवर असलेले रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस नाईक राहूल चौधरी यांना समजले. त्यांनी तातडीने शिवकॉलनी येथे विनाक्रमांकाचे ट्रक्टर पकडले. वाळू वाहतूकीबाबत परवाना विचारला असता उडवाउडवीचे उत्तरे मिळाली. वाळूने भरलेले ट्रॅक्टर रामांनदनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याप्रकरणी पोलीस नाईक राहूल चौधरी यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक उमेश विठ्ठल बाविस्कर (वय-२२) रा. निमखेडी ता.जि.जळगाव याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जितेंद्र तावडे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!