वानखेडेंच्या मातोश्रींचे दोन्ही धर्माच्या मृत्यूचे दाखले !

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आज पुन्हा नवीन आरोप लावत त्यांच्या आईच्या मृत्यूची दोन धर्मांची स्वतंत्र नोंद करण्यात आल्याची कागदपत्रे जाहीर केली आहेच.

राज्याचे अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आज पुन्हा एक नवीन आरोप लावला आहे. महापालिकेच्या मृत्यू नोंदणीमध्ये समीर वानखेडे यांच्या मातोश्री झाएदा ज्ञानदेव वानखेडे यांची मुस्लिम अशी नोंद आहे. तर मृत्यू अहवालात त्यांची हिंदू अशी नोंद असल्याची दोन कागदपत्रं नवाब मलिक यांनी ट्विटच्या माध्यमातून शेअर केली आहेत. वानखेडे यांचा हा नवीन फर्जीवाडा असल्याचे त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

समीर वानखेडे यांच्या आई जायदा ज्ञानदेव वानखेडे यांच्या मनपाच्या डेथ रजिस्टरी रेकॉर्डमध्ये मुस्लिम अशी नोंद आहे, तर डेथ रेकॉर्डला हिंदू अशी नोंद असल्याचा दावा नवाब मलिकांनी केला आहे. डेथ रजिस्टरमध्ये मृत्यू दिनांक १६ एप्रिल २०१५ अशी नोंद आहे. यामध्ये मुस्लिम अशी नोंद झाली आहे. तर डेथ रिपोर्ट १७ एप्रिल २०१५ रोजीचा आहे. यात जायदा वानखेडे यांची हिंदु असल्याची नोंद करण्यात आली आहे, असा दावा नवाब मलिकांनी केला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!