वाढत्या महागाई विरुद्ध मजदूर संघाची निदर्शने (व्हिडिओ)

जिल्हाधिकाऱ्याना दिले निवेदन

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – राज्यात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली असून त्याविरोधात भारतीय मजदूर संघातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

राज्यात तसेच जिल्ह्यात गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.  महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. इंधनाच्या दराच्या रकमेत अन्य राज्यानी कर रकमेत कपात केली. परंतु राज्य सरकारने कोणतीही कर कपात केलेली नाही त्यामुळे दरवाढ मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. यावर सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने संवेदनशील पणे यावर उपाययोजना कराव्यात, पेट्रोल डीझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे, जीवनावश्यक वस्तूच्या किमतीवर नियंत्रण आणावे, आदी मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येऊन भारतीय मजदूर संघातर्फे जिल्हाधिकारी याना निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, सचिव सचिन लाडवंजारी, सुरेश सोनार, ज्ञानेश्वर पाटील, बि.बि. सपकाळे, प्रवीण मिस्तरी,  किशोर वाघ  आदि पदाधिकारी उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!