वाघोद्यात आ. चंद्रकांत पाटील व तहसिलदारांच्या हस्ते विविध दाखले व धनादेशाचे वाटप

 

रावेर प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाचे महाराजस्व अभियानअंतर्गत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे मा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक कामाकरीता विविध प्रकारचे एकुण ६०० दाखले वाटप करण्यात आले.

आ. चंद्रकांत पाटील यांनी शिवरस्ते व पाणंदरस्तेची पाहणी करुन व अतिक्रमण रस्त्याची संदर्भात शेतक – यांशी चर्चा केली. तसेच मतदारसंघातील संजय गांधी विधवा कुटुंबाना अर्थसाहाय्य योजने अंतर्गत २९ लाभार्थ्यांना प्रत्यकी २० हजार प्रमाणे धनादेशाचे वाटप करण्यात आले . फेर फार आदालत फेर फार नोंदी घेवून ७/१२ उतारे वाटप करण्यात आले . कोवीड महामारी काम करणारे आरोग्य सेवक ,आशा वर्कर्स यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास. तहसिलदार उषाराणी देवगुणे, नायब तहसिलदार संगायो. मनोज खारे, गजेंद्र शेलकर, मंडळ अधिकारी सचिन पाटील, तलाठी प्रविण वानखडे, तलाठी अनंता खवले , ईसेवा केंद्रचालक स्वप्नील पवार तसेच शेतकरी डी.के .महाजन, किशोर पाटील , उपसरपंच लक्ष्मीकांत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य,उदय पाटील, मुबारक उर्फ राजू तडवी, माजी सरपंच अनिल चौधरी, आरोग्य केंद्राचे डॉ .राणे,यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. पाटील यांनी तर आभार अनंता खवले यांनी मानले.

Protected Content