वाघळुद फाट्यावर अपघातात पिता ठार , मुलगी जख्मी

 

 

 यावल :  प्रतिनिधी । तालुक्यातील यावल भुसावळ मार्गावरील वाघळुद फाट्यावर मोटरसायकलला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या  अपघातात मोटारसाकलस्वार पित्याचा   जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेली त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे

 

.  २१ एप्रिल रोजी दुपारी वाजेच्या सुमारास  मोटरसायकलने सुरेश सोनवणे ( वय ४५ , रा – आव्हाणे ,  ता . जि .जळगाव )  व त्यांची मुलगी मनिषा  सोनवणे ( वय १९  )  हे  म्हैसवाडीकडू बोरावलमार्ग जातांना भुसावळकडुन यावलकडे येणाऱ्या ट्रक ( क्र  जि जे २७ टीटी ४३७८ ) ने धडक दिल्याने झालेल्या  अपघात सुरेश सोनवणे हे जागीच मरण पावले   त्यांची मुलगी मनिषा सोनवणे गंभीर जखमी झाली   त्याच वेळी अंजाळे येथील   धनराज शांताराम सपकाळे व सागर निवृती तायडे यांनी घटनास्थळी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या तरूणीची तात्काळ मदत करून तिला ग्रामीण रुग्णालयात पोहचवले यावलच्या ग्रामीण रुग्णालयात औषधपचार करण्यात येवुन तिला पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठवण्यात आले आहे . मयत सुरेश सपकाळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण  रुग्णालयात पोलिसांनी आणला  .पोलीसांनी अपघातास कारणीभुत असलेल्या ट्रकला व वाहनचालकास ताब्यात घेतले आहे

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.