चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील वाकडी येथे गोठ्यात बांधलेला बैल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील सुनील वसंत पाटील (वय-४२) हे शेती व्यवसाय करून कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत असतात. शेती हा व्यवसाय असल्याने सुनील पाटील यांच्या मालकीचे खिल्लारी बैल जोडी आहे. त्यांना नेहमी घरा जवळील गोठ्यात बांधलेले असतात. दरम्यान पाटील हे शुक्रवारी रोजी दिवसभर शेतात काम करून आले. व बैलांना गोठ्यात बांधून झोपून गेले. मात्र पाटील यांना १३ रोजी रात्री ३ वाजताच्या सुमारास जाग आल्याने घराबाहेर आला. परंतु गोठ्यात बांधलेल्या बैलांमधून एकच बैल दिसून आले. त्यावर घरच्यांनी परिसरात शोधाशोध केली असता बैल मिळून आले नाही. म्हणून कोणीतरी अज्ञात इसमाने १५ हजार रुपये किंमतीचे एक बैल चोरून नेल्याचे उघडकीला आले. त्यावर सुनील वसंत पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास संदीप माने हे करीत आहेत.