वसंतनगरात आ. अनिल पाटील यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण

पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील वसंतनगर तांडा, भोलाणे व पिंपळकोठा येथे आ. अनिल पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण आज करण्यात आले.

तालुक्यातील वसंतनगर तांडा येथे आ. अनिल पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण आज करण्यात आले. यात प्रामुख्याने गावातील रस्ते, सिमेंट कांक्रेटीकरण, गटार, अंदाजित किंमत १० लाख तसेच गावाची स्मशान भुमी पर्यंत चा सिमेंट रस्ता, बैठक सेड अंदाजित किंमत ५ लाख असे अनेक कामांचे वसंतनगर तांडा येथे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. मागील पंधरा ते वीस वर्षांपासून मागणी असलेला मुकटी रा.म. ६ ते भोलाणे, वसंतनगर, पिंपळकोठा, इंधवे, डांगर रस्ता डांबरी करण इजिमा .८३ कि. मी ०/०० ते ७/०० सुधारणा करणे या कामाची अंदाजित किंमत : ३,कोटी ऐवढा निधी आमदार अनिल पाटील यांनी मंजूर करून दिला. आता या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहेत. पुढे बोलताना आमदारांनी पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत राज्य सरकार कडून मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेल तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच शेतकऱ्यांना मिळेल असे आश्वासन दिले आहे.

याप्रसंगी आमदार अनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहिदास दाजी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रंथालय विभाग चे उमेश पाटील, माजी पं.समिती उपसभापती चंद्रकांत पाटील, भोलाणे गावाचे सरपंच शिवा पाटील, पिंपळकोठा गावाचे सरपंच भैय्यासाहेब पाटील, उपसरपंच पिंपळकोठा नानाभाऊ पाटील तसेच वसंतनगर तांड्याचे सरपंच राजाराम उदेसिंग जाधव, उपसरपंच लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष शाम रोहिदास जाधव, सदस्य पांडूरंग जसवंत जाधव, सदस्य रतिलाल जाधव, सदस्य केळकर जाधव, दरबार जाधव, मलखाण जाधव, माजी सरपंच छगन प्रयाग जाधव, चंद्रसिंग नाईक, परमा लालू जाधव, संतोष जाधव, रमेश जाधव, अरविंद जाधव, रंगलाल जाधव, पंडित जाधव, तसेच वसंतनगर तांड्याचे ग्रामस्थ उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!