वरणगाव नपच्या मनमानीचा साधनानगरातील रहिवाशांना त्रास

सांडपाणी , गटारांची दिशा बदलण्याचा विनाकारण उपद्व्याप

 

 

वरणगाव  : प्रतिनिधी । येथील साधनानगरमध्ये 50 कुटुंब अनेक वर्षापासून राहत आहेत या कुटुंबाच्या सांडपाणी व गटारीचे पाणी आजपर्यंत ज्या दिशेने वाहते ते बंद करण्याचा घाट नपाने घातला असून ते विरुद्ध दिशेने वळवण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे

 

नगरपालिकेच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील रहिवासी दीपेश पाटील यांनी नपला निवेदनही दिले ज्या दिशेने गटारीचे व सांडपाणी वाहत आहे त्याच दिशेने सुरू ठेवण्याची विनंती केली तरीदेखील नगरपरिषद विरुद्ध दिशेने सांडपाणी वळवण्याच्या तयारीत आहे हे सांडपाणी विरुद्ध दिशेने वळवण्यात आले तर प्रत्येक घराच्या ड्रेनेज पाईपलाईनची उंची वाढवावी लागणार आहे त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला विनाकारण आर्थिक बोजा सोसावा लागणार आहे  नगरपालिकेच्या मनमानीला  साधनानगर येथील रहिवासी कंटाळून गेले आहेत  नगरपालिका प्रशासनाने ज्या  दिशेने सध्या सांडपाण्याचा निचरा होत आहे त्याच दिशेने सुरू ठेवण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!