वरणगाव जवळ भीषण अपघात : पती ठार, पत्नी गंभीर जखमी

वरणगाव तालुका भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी l येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर एका दुचाकीला दिलेल्या धडकेत पती ठार झाला असून पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली आहे.

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की भुसावळ येथील नवमहाराष्ट्र स्टोअर्सचे संचालक ललित प्रभाकर नेमाडे  हे आपल्या सौभाग्यवतीसह आज पौर्णिमा असल्याने हरताळा येथील देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी दुचाकीवरून जात होते. दरम्यान वरणगाव बायपास वरून जाणाऱ्या महामार्गावर त्यांच्या दुचाकीला वाहनाने जोरदार धडक दिली. यात ललित प्रभाकर नेमाडे ( वय 48 राहणार भुसावळ) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या सौभाग्यवती या गंभीर जखमी झाल्या आहेत.

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. यासोबत भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे हे आपल्या सहकाऱ्यांसह अपघात स्थळी दाखल झाले आहे. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या संदर्भात वरणगाव पोलीस स्थानकात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content