वरणगावात कोविड सेंटर सुरु करा ; शिवसेना पदाधिकाऱ्यांची जिल्हा शल्य चिकित्सक व तहसीलदारांशी चर्चा

भुसावळ : प्रतिनिधी । वरणगाव येथे   त्वरित कोरोना  रुग्णांसाठी सीसीसी सेंटर सुरू करण्याबाबत शिवसेना (भुसावळ तालुका) तर्फे जिल्हा शल्य चिकित्सक व तहसीलदार यांना निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली

वरणगाव शहर ,परिसरातील ग्रामीण भाग ,  आयुध निर्माणी , दिपनगर येथील कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे   जनता हवालदिल झाली असल्याने वरणगाव शहराच्या लोकसंख्येच्या विचार करता ती जवळपास पन्नास हजार आहे वरणगाव शहर व ग्रामीण भागाचा विचार करता येथे  उपचारासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नाही  त्वरित covid-19 सीसीसी सेंटर सुरू करून रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर व  कर्मचाऱ्यांची  नेमणूक करून रुग्णांना व   नातेवाईकांना दिलासा द्यावा त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत आम्ही शिवसेनेच्यावतीने करण्यास तयार आहोत  असे शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व तहसीलदार यांच्याशी चर्चा करताना सांगितले

 

वरणगाव  नगर परिषदेचे मुख्याधिकारी   जोशी  यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनीदेखील सकारात्मक चर्चा करून आपण उद्या बसून निर्णय घेऊ असे सांगितले   जिल्हा शल्य चिकित्सक  यांनीं  जिल्हाधिकारी यांच्याशी  चर्चा करून त्वरित निर्णय घेऊ व रुग्णांसाठी सीसीसी सेंटर चालू करू असे आश्वासन दिले तहसीलदार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकारी तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व ग्रामीण रुग्णालय आरोग्यअधिकारी यांच्याशी चर्चा करून वरणगाव येथे सीसीसी सेंटर चालू करणेबाबत कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले

 

कोणत्या ठिकाणी सीसीसी सेंटरची व्यवस्था करू शकतो अशा जागाविषयी देखील चर्चा करण्यात आली जागांची पाहणी करून कर्मचाऱ्यांची व डॉक्टरांची  नेमणूक करून सीसीसी सेंटर चालू करण्यात येईल जिल्हा शल्य चिकित्सक  यांनी  शिवसेनेने मागणी केल्याप्रमाणे ग्रामीण रुग्णालय वरणगावसाठी डॉक्टर जैन यांची नवीन नेमणूक करून जनतेला दिलासा दिला आहे त्याबद्दल शिवसेनेच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले

 

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन , उपजिल्हा संघटक विलास मुळे , पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे , अल्पसंख्यांक उपजिल्हा संघटक सईद मुल्लाजी , निलेश ठाकूर हे उपस्थित होते त्यांच्या निवेदनावर सह्या आहेत आतापर्यंत वरणगावला सीसीसी उपचार केंद्र व्हावे म्हणून पालकमंत्री  गुलाबराव पाटील  यांच्या मार्गदर्शनाने व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने मार्गक्रमण चालू आहे  सीसीसी सेंटर उपलब्ध होण्यासाठी वरणगावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक परिश्रम घेत आहेत

 

 

Protected Content