वयोवृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिव कॉलनी परिसरात ६३ वर्षीय वयोवृद्धने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले

अधिक माहिती अशी की पद्माकर सुकलाल सूर्यवंशी (वय ६३, परिजात अपार्टमेंट शिव कॉलनी) आपला मुलगा व सून सोबत राहतात. मंगळवारी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना पंख्याला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. हा प्रकार घडला त्यावेळी सून ही माहेरी गेली होती तर मुलगा सुहास सूर्यवंशी हा रेल्वेत नोकरीवर असल्याने कामावर गेला होता. सायंकाळी ५.३० वाजता मुलगा सुहास ड्यूटीवरुन घरी आला. त्यावेळेस वडील पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच शेजारच्यांना मृतदेह खाली उतरून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कुरकुरे यांनी मयत घोषित केले. रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेका ज्ञानेश्वर सोनवणे, रमेश अहिरे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.