वन खात्याच्या पथकाने जप्त केला अवैध डिंक

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वन खात्याच्या पथकाने पुन्हा एकदा धडक कारवाई करत अवैध डींक वाहतूक करणारी मोटर सायकल व चाळीस किलो सलई डींक जप्त केल्याने डिंक तस्कर धास्तावले आहेत.

 

वन खात्याने अलीकडच्या काळात अवैध डिंक तस्करांवर मोठी धडक कारवाई केली आहे. अशीच एक कारवाई रात्री करण्यात आली.   परिक्षेत्र मधील वन कर्मचारी शासकीय वाहनाने रात्री गस्त करून सापळा रचून केर्‍हाळा गावा जवळ केर्‍हाळा ते पिंप्री रस्त्याने अवैध गौण वनउपज (सलई डिंक) वाहतूक करणारे एक मोटार सायकलचा पाठलाग केला असता अंधाराचा फायदा घेत आरोपी मोटरसायकल सोडून  फरार झाले आहे.

 

या कार्यवाहीत  एक मोटरसायकल टीव्हीएस मॅक्स फोर आर ( एम एच १९ बी ए ०५२८ ) हे  वाहन किंमत अंदाजे ३०,००० रुपये तसेच सलई डिंक ४० किलो ४,४०० रु एकूण  ३४,४०० किंमतीचा मुद्देमाल  भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१(ब)४२ ५२अन्वये वनपाल अहिरवाडी प्रथम रिपोर्ट नोंदवून जप्त केला.

 

की कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर अजय बावणे वनपाल राजेंद्र सरदार,रवींद्र सोनवणे,अरविंद धोबी वनरक्षक रमेश भुतेकर .वाहन चालक -विनोद पाटील यांनी संयुक्त रित्या कार्यवाही केली. पुढील तपास वनपाल अहिरवाडी करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content