वन्यजीव संरक्षण संस्थेची चायना मांजा विरोधात जनप्रबोधन मोहीम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने महाबळ, रामानंदनगर परिसरात चायना मांजा विरोधात जनप्रबोधन मोहिम शुक्रवारी १३ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान राबविण्यात आली. मांजामुळे पक्षांसाठी होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजनांची महिती देण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर पंतग बाजी सुरू राहणार आहे. यात चायना मांजाचा मोठा वापर केला जात असल्याने या मांजामुळे अनेक पक्षी जखमी होत असतात. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने मांजात अडकलेले पक्षी रेस्क्यू करून त्यांनी निसर्गात मुक्त करण्याचे मोलाचे काम करत आहे. तसेच जखमी पक्षी पशुवैद्यकीय रूग्णालयात उपचार करून वनविभागाच्या ताब्यात देण्यात येतात. या पार्श्वभूमीवर वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने चायना मांजा विरोधात जनप्रबोधन करण्यात येत आहे. जळगाव शहरातील महाबळ, रामानंद नगर, आशा बाबा नगर, मेहरूण, पिंप्राळा यासह इतर भागात शुक्रवारी १३ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान जनजागृती करण्यात आली. दरम्यान, परिसरात राहणाऱ्या काही मुलांनी त्यांच्याजवळ असलेला चायना मांजा संस्थेकडे जमा करण्यात आला. जनजागृती उपक्रमाला नागरीकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान कुणालाही जखमी पक्षी आढळून आल्यास वन्यजीव संरक्षण संस्था किंवा वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक रविंद्र फालक यांनी केले आहे. तसेच येत्या आठवड्यात धरणगाव, भुसावळ, चोपडा, जामनेर, व इतर तालुक्यात जनजागृती करण्यात येणार आहे , असे जगदीश बैरागी यांनी सांगितले. जनजागृती मोहीमेसाठी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र मुकेश सोनार, जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, बाळकुष्ण देवरे, योगेश गालफाडे, रविंद्र सोनवणे यांच्यासह आदी परिश्रम घेत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content