वडील व भावाचा खून करणार्‍याला दोन दिवसांची पोलीस कोठडी

शेअर करा !

पहूर , ता. जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा प्र.लो. येथे आपले वडील आणि भावाचा खून करणार्‍या आरोपीला आज न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

store advt

जामनेर तालुक्यातील नांद्रा प्रलो येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला पहूर पोलिसांनी न्यायाधिश सचिन हवेलीकर यांच्या न्यायालयासमोर हजर केले. सरकारी वकील सौ. कृतिका भट यांनी पोलिसांतर्फे युक्तिवाद केला. यावर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नांद्रा प्र. लो. येथे शनिवारी मध्यरात्री क्षुल्लक कारणावरून जन्मदात्या पित्याची व लहान भावाची मोठ्या भावाने धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी पहूर पोलिसांनी आरोपी निलेश आनंदा पाटील यास शिताफीने अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .आज त्यास जामनेर न्यायालयासमोर हजर केले असता २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, आज अतिशय शोकाकुल वातावरणात मृत पिता-पुत्राच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. परिसरात याचीच चर्चा सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

वेबसाईट: https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज

jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!