वडली येथील तरूणाची झाडाला गळफास घेवून आत्महत्या

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वडली येथील २३ वर्षीय तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

store advt

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील वडली येथे रितेष उर्फ राजू सुरेश पाटील (वय-२३) याने राहत्या घरापासून काही अंतरावर असलेल्या देवराम महाराज मंदीराच्या मागे निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आला. गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने कुठल्याच ठिकाणी काम मिळत नसल्याने नैराश्य आले होते. राजू हा वाहन चालक होता. ट्रॅक्टर, चारचाकी कार, मालवाहू वाहनांवर रोजंदारीने तो कामाला जात होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!