लोणार सरोवराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

बुलढाणा अमोल सराफ । लोणार सरोवर विलोभनिय आहे, या सरोवराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही देत यापुढे लोणार विकासाचा कार्यक्रम थेट मुख्यमंत्री कार्यालयातून होईल अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

जगविख्यात लोणार सरोवराला आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ५ जानेवारीला बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला भेट दिली. लोणार येथील वनकुटी-व्हु-पाईन्ट आणि धारातीर्थ गोमुख परिसरात जावुन त्यांनी सरोवराची पाहणी केली. त्यानंतर अधिकार्‍यांची विशेष बैठक घेऊन लोणार विकास आराखड्यासंदर्भात अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

https://www.facebook.com/508992935887325/videos/155385362922429

 

Protected Content