मुंबई प्रतिनिधी । गत काही दिवसांपासून लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होणार असल्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याचे संकेत मिळाले असून या दोन्ही निवडणुका स्वतंत्र होणार असल्याचे वृत्त आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रीत होणार असल्याची चर्चा सुरू होती. विशेष करून राज्यात भाजप आणि शिवसेनेतील तणावामुळे निवडणुका एकत्र करण्याची तयारी भाजप नेतृत्वाने सुरू केली होती. तथापि, यामुळे अनेक आमदारांना धडकी भरली होती. विशेष करून तयारीसाठी कमी वेळ मिळणार असल्यामुळे आमदारांची नाराजी होती. या पार्श्वभूमिवर, महाराष्ट्रात वेळेतच म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातच विधानसभा निवडणूक होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. भाजप श्रेष्ठींनी याला होकार दिला असून यामुळे राज्यातील तमाम इच्छुकांना दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.