लोकसभा अध्यक्षांना शिवसेनेच्या ‘त्या’ १२ खासदारांचे पत्र

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । शिवसेनेचे १२ खासदार हे शिंदे गटात सहभागी झाले असून नव्याने स्वतंत्र गटासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेवून गटनेता बदलण्याची मागणी करत पत्र दिले आहे.

 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर गटासाठी लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचा विश्वासही या खासदारांनी व्यक्त केला आहे. स्वतंत्र गटासंदर्भात देखील लवकरच निर्णय घेण्याची मागणी देखील लवकरच होईल असा त्यांना विश्वास आहे. यासंदर्भात 12 खासदारांनी पत्र लोकसभा अध्यक्षांना तीन मागण्यांचे एक पत्र दिले आहे.

 

या आहेत तीन मागण्या

राहुल शेवाळे यांना लोकसभेचे गटनेते करा,

संसद भवनामध्ये नवीन कक्ष कार्यालय या गटाला द्यावे

पक्षप्रतोद म्हणून भावना गवळी यांची नियुक्ती करावी या तीन मागण्यांसाठी पत्र देण्यात आले आहे.

 

हे आहेत १२ खासदार

यामध्ये भावना गवळी, राहुल शेवाळे, हेमंत गोडसे, धैर्यशील माने, संजय मंडलिक, राजेंद्र गावित, श्रीरंग बारणे, सदाशिव लोखंडे, प्रताप जाधव, कृपाल तुमाणे, हेमंत पाटील, श्रीकांत शिंदे यांचा समावेश होता.

 

१२ खासदारांनी आता शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर आता आपली काय भूमिका असणार हे स्पष्ट केले आहे. यापुढे मुख्यमंत्री यांच्या समवेत कामे केली जाणार आहेत. याबाबत भेटी दरम्यान चर्चा झाली असून विकास कामांबाबतही चर्चा झाली आहे. शिवाय आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली जाणार आहे. भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप वेळ मिळालेली नाही. यासंदर्भात लवकरच निर्णय होणार असून या स्वतंत्र गटाची भूमिकाही स्पष्ट केली जाणार आहे. शिवसेनेतील १२ खासदारांनी शिंदे गटात सहभाग नोंदवल्यापासून राजकीय घडामोडीला वेग आला आहे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.