लोकप्रतिनिधी, कर्मचारी व अधिकारी यांच्या दुर्लक्षाने कोरोना संसर्गात वाढ : निळकंठ चौधरी यांचा आरोप (व्हिडिओ)

 

रावेर, प्रतिनिधी। तालुक्यात लोकप्रतिनिधी, कर्मचारी व अधिकारी यांचे दुर्लक्ष झाल्याने कोरोना पोझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी यांनी केला असून याबाबतची तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली असल्याचे सांगितले.

store advt

रावेर तालुका कोरोना रुग्णांच्याबाबत जिल्ह्यात चौथ्या क्रमकांवर असून लवकरच पहिल्या क्रमांकावर जाईल, आजची परिस्थिती पाहता कोविड रुग्णालय अपूर्ण पडेल अशी भीती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना व्यक्त केली. शेजारील मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतांना रावेर तालुक्यात रुग्ण वाढण्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न श्री. चौधरी उपस्थित केला आहे. यात दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांना तालुक्यातील परिस्थितीबाबत माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे. या परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही सर्व परिस्थिती अवगत करेन असेही श्री.चौधरी यांनी स्पष्ट केले.

 

error: Content is protected !!