जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील लेवा नवयुवक संघाने आयोजित केलेल्या विश्वस्तरीय लेवा पाटीदार विवाहेच्छू परिचय मेळावा एकलव्य मैदानात मोठ्या उत्सहात पार पडला.
विश्वस्तरीय लेवा पाटीदार विवाहेच्छू परिचय मेळाव्यात १९० हून अधिक विवाहेच्छू वधू तर ३०० हून अधिक वरांनी व्यासपीठावर परिचय करून दिला. परिचय मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंब नायक रमेश विठू पाटील, माजी मंत्री तथा आ. एकनाथराव खडसे, माजी खा. डॉ. उल्हासदादा पाटील यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी लेवा पाटीदार समाजातील शैक्षणीक प्रगती ही आधीप्रमाणेच विलक्षण गतीने होत असून अलीकडच्या काळात कंप्युटरकडे तरूण-तरूणींचा ओढा वाढल्याची बाब कौतुकास्पद आहे. याच्या जोडीला कृषी, उद्योजकता आदींसह विविध क्षेत्रांमधील समाजाचे प्रगती चांगली असून एकमेकांना मदतीचा हात देऊन समाजहित साधावे ! असे आवाहन माजी खासदार तथा गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील यांनी केले.
लेवा पाटीदार समाजात एकाच शहरात दोन वा त्यापेक्षा जास्त परिचय मेळावे होत असून हा प्रकार टाळला गेला पाहिजे. आगामी काळात सामूहिक विवाह सोहळ्यांना देखील प्राधान्य मिळायला हवे !” अशी अपेक्षा आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली. तर ”विवाहासारख्या सोहळ्यांमध्ये कालानुसार नवीन बदल स्वीकारतांनाच खोट्या प्रतिष्ठेपायी करण्यात येणारा खर्च टाळावा !” असे आवाहन देखील त्यांनी केले. यावेळी आमदार राजाभाऊ भोळे डॉ. ए.जी. भंगाळे, उद्योजक सुनील बढे, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, आ. शिरीष चौधरी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रणिता झोपे, नितीन नेमाडे, सविता भोळे यांनी केले. या विवाहेच्छू मेळाव्यात ३५ हून अधिक विवाह जमण्याचे प्राथमिक संकेत मिळाले. देश विदेशातून आलेल्या या महामेळाव्यास भव्य असे स्व. तुकाराम श्रीपाद चौधरी सभामंडप उभारण्यात आला होता. यशस्वीतेसाठी डी. ए. पाटील, कैलास पाटील, किरण चौधरी, चंदन कोल्हे, मोहन बेंडाळे, जयेश भोळे, प्रा. सुभाष भोळे यांनी कामकाज पाहिले.
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४