लायन्स क्लब गोल्ड सिटीतर्फे गरजूंना औषधींचे वितरण

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील लायन्स क्लब गोल्ड सिटीतर्फे राबविण्यात येत असलेल्या विश्व सेवा सप्ताहानिमित्ताने गरजू रुग्णांना ४ हजार ५०० रुपयांच्या औषधींचे वितरण शुक्रवारी २ रोजी करण्यात आले.

लायन्स क्लब जळगाव गोल्ड सिटीच्या वतीने दि. २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान विश्व सेवा सप्ताह साजरा केला जात आहे. पहिल्या दिवशी शहरातील १० गरजू रुग्णांना औषधी वाटप करण्यात आली आहेत. यामध्येएकूण ४ हजार ५०० रुपयांच्या महिनाभराच्या औषधी आहेत. विशेष म्हणजे १३ वर्षीय बालकाला १ महिन्यांच्या इन्शुलिन इंजेक्शनची देखील मदत करण्यात आली आहे. पुढील महिन्यात देखील औषधी वितरित करण्याचे नियोजन केले जाणार आहे. यावेळी लायन्स क्लब गोल्ड सिटीचे अध्यक्ष उमेश सैनी, सचिव आणि प्रकल्प प्रमुख अमित कोठारी, लेखराज उपाध्याय उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.