लस दुसऱ्या देशात देण्याची गरज नव्हती ; अजित पवारांची आदर पूनावालांवरही नाराजी

 

 

पुणे : वृत्तसंस्था । सुरुवातीला तयार होणारी कोरोना लस दुसऱ्या देशात देण्याची गरज नव्हती त्यामुळे आपल्याला लसींची कमतरता भासल्याचे  सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिरम इन्स्टिट्यूटचे संचालक आदर पुनावाला यांच्या भूमिकेवरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे

 

राज्याला अधिक लस मिळाली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पूनावाला यांच्याशी चर्चा केली. निश्चित लसीचा अधिकाधिक पुरवठा केला जाईल असे त्यावेळी सांगितले गेले. मात्र नंतर एवढा पुरवठा करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्याची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र आणि देशासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावयाला पाहिजे होती. लसीचा प्लांट आपल्या पुण्यात असल्याने, आपल्या इथे अधिक लस कशी मिळेल यासाठी प्रयत्न झाले पाहिजे”, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात मांडली.

 

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ध्वजारोहण केले. त्यानंतर राज्यातील अनेक प्रश्नांवर त्यांनी भूमिका मांडली. अजित पवार म्हणाले की, लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्राने हाती घेतला आहे. तरी देखील राज्य सरकार भारत बायोटेककडे अधिक लस कशा मिळतील यासाठी प्रयत्न करत आहे. नागरिकांचे अधिकाधिक लसीकरण कसे होईल यावर सरकारचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या देशात आणि राज्यात कुंभमेळा, सार्वत्रिक निवडणुका यामुळे बधितांचे प्रमाण वाढले आहे.  दोन वेळा डोस द्यावा लागणार, असल्याने 12 कोटी डोस घ्यावे लागणार आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीत साडे सहा हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. ही संपूर्ण रक्कम आम्ही एकरकमी देण्यास तयार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.