लष्करात नोकरीचे आमिष : तब्बल १५ लाखांची फसवणूक

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लष्करात नौकरी लावून देण्याचे आमिष देऊन येथील  तरुणाकडून १५ लाख १६ हजार रुपये घेऊन फसवणूक करणार्‍या नाशिकच्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पाचोरा येथील शेती करणार्‍या व तलाठी कॉलनी येथे राहणारे प्रवीण हरी शिंदे यांच्याकडून आरोपी रामकृष्ण शंकर राऊत याने लष्करात नौकरी लावून देण्याचे आमिष दाखवून प्रवीण शिंदे आणि त्यांच्या भावाने २० ऑगस्ट २०१९ ते १४ सप्टेंबर २०२० दरम्यान १५ लाख १६ हजार रुपये नाशिक रोड खात्यातून आरोपीच्या खात्यात जमा केले.

 

मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवीण शिंदे यांनी याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content