लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार; तरूणाला अटक

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय तरूणीवर अत्याचार केल्याप्रकरणी तरूणाला अटक करण्यात आली आहे. तरूणीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, महाविद्यालयात शिकणारी २१ वर्षीय तरूणीशी नरेंद्र ज्ञानदेव सोनवणे (वय-२४) रा. मेक्सोमाता नगर यांची ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. यातच नरेंद्रने तरूणीला लग्नाची आमिष दाखवत तीला सप्टेंबर २०१९ मध्ये जळगावातील एका हॉटेलमध्ये नेले. त्याठिकाणी लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केला. काही १८ ऑक्टोबर २०१९ आणि १९ मार्च २०२० रोजी हॉटेलमध्ये नेले. त्याठिकाणी पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मात्र तरूणीने नकार दिला असता तिचे फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली व पुन्हा अत्याचार केला. याप्रकरणी पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी संशयित आरोपीला पकडण्यासाठी पथक रवाना केले. पोकॉ मुकेश पाटील, हेमंत कळस्कर, चंद्रकांत पाटील, विजय बावस्कर यांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे. पुढील तपास सपोनि, रतिलाल पवार करीत आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!