लखनऊ कोर्टात वकिलावर बॉम्ब हल्ला ; तीन जण जखमी

शेअर करा !
370057 eqo6dytuyaavwnl
 

लखनऊ (वृत्तसंस्था) येथील वझीरगंज सत्र न्यायालयात आज, क्रूड बॉम्बने हल्ला केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात अनेक वकील जखमी झाले असून घटनास्थळी दोन जिवंत बॉम्ब सापडले आहेत.

 

येथील सीजेएनम कोर्टाच्या परिसरात वझीरगंज सत्र न्यायालयात झालेल्या एका बॉम्बस्फोटात दोन वकील जखमी झाले आहे. हा स्फोटात या हल्ल्यातून लखनौ बार असोसिएशनचे संयुक्त सचिव आणि वकील संजीव लोधी हे गंभीर जखमी झाले आहेत. लोधी यांच्या चेंबर समोर तीन बॉम्ब फेकण्यात आले. तीनपैकी एक बॉम्बचा स्फोट झाला आणि दोन जिवंत बॉम्ब सापडले आहेत. बॉम्ब स्फोट झाल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. पोलीसांनी परिसराची तपासाणी केली असता, तेथे तीन देशी बॉम्ब सापडले. दरम्यान, काही वकिलांमध्ये असणाऱ्या परस्पर वैमनस्यातून हा घातपात घडवून आणल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!